न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेला असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडीने गुन्हा दाखल केला. तर शरद पवार साहेब अस्सल सोनं आहेत, ईडीची चौकशी राजकीय सुडबुध्दीने असून हा शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिं. चीं. शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस बच्छाव यांंनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरचंद्रजी पवार साहेब हे राज्य सहकारी बँकेत नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी बँकेमध्ये संचालक नव्हते, तसेच त्या संस्थेच्या प्रशासनामध्ये आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये साहेबांचा कसलाही संबंध नसताना देखील केवळ राजकीय सुडबुध्दीने शरद पवार साहेबांचे नाव त्या प्रकरणात गोवण्यात आलेय.हे सर्व राजकीय आकसाने करण्यात आले असून आम्ही ह्याचा विरोध करतो. हा ईडीसहीत इतर तपास यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात चाललेला शासनप्रणित दुरूपयोग आहे.
भाजप सरकार हुकूमशाही पध्दतीने आपल्या विरोधातील राजकीय पक्षाचे नेत्यांना जाणिवपुर्वक त्रास देत आहे. ज्याने सरकार विरोधात काहीही बोलू नये, व ‘हम करे सु कायदा’ हेच धोरण सरकारचे आहे. पवार साहेब संपुर्ण महाराष्ट्र राज्य पिंजून काढत आहेत. साहेब ज्या जिल्ह्यांमध्ये जातात, त्या ठिकाणी पक्षाला जनसामान्यांचा तसेच तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकारकडून राजकीय सुडबुध्दीने अशा पध्दतीचे कुटील डाव रचण्यात येत आहेत, असे बच्छाव यांनी म्हटले आहे.















