न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- चिंता करण्याचं काहीही कारण नाही अजित पवारच तुमच्याशी बोलतील अशी माहिती शरद पवार यांनी दिली. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातलं सगळं राजकारण ढवळून निघालं. पुण्यात गेलेल्या शरद पवारांनी तातडीने मुंबई गाठली आज दीड तास अजित पवारांसोबत बैठक पार पडली यानंतर शरद पवार यांनी अजित पवारच तुमच्याशी बोलतील असं पत्रकारांना सांगितलं.
अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा का दिला? शरद पवारांनी त्यांची काय समजूत घातली? शरद पवार यांची शिष्टाई यशस्वी झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळू शकणार आहेत. कारण अजित पवार काही वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत.
शरद पवार यांनी सिल्वर ओक या ठिकाणी ही माहिती दिली. दुपारी साडेतीनच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडतील.












