न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा मोठा सण बैल पोळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर बळीराजाच्या शेतात राबणाऱ्या बैलांसाठी हा सण साजरा करण्यात येतो.

आज शनिवारी (दि. २८) रोजी बैलांना विश्रांती देऊन त्यांची पूजा करून त्यांना विविध रंग, शिंगाना तुरे लावून बैलांची उपनगरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रहाटणी परिसरातील तापकीरनगर येथेही प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, नवीन तापकीर यांनीही पारंपारिक वाद्य, फटाके वाजवत गाजवत बैलांची मिरवणूक काढत पोळा साजरा केला.
तसेच काळेवाडीतील तापकीरनगर परिसरात चिंचवड विधानसभा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर, हरेश तापकीर, राजदीप तापकीर, बाबासाहेब तापकीर, यांनी बैलांना सजवीत ढोल व ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढत बैलपोळा साजरा केला.











