न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०१९) :- अखेर शिवसेनेने पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा आमदार गौतम चाबुकस्वार यांनाच उमेदवारी दिली आहे. आज मातोश्रीवर त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म दिला.
‘पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडून या’ असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुखांनी आमदारांना सूचना केल्या.


















