न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी डुडूळगाव, मोशी, जाधववाडी परिसरातील वाड्या, वस्त्यांवर जात नागरिकांच्या सोमवारी (दि. ३०) भेटी-गाठी घेतल्या. पदयात्रा, कोपरा सभा काढण्यात आल्या. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातून दुस-या वेळी आमदार महेश लांडगे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मागील पाच वर्षात भोसरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यांच्यामुळेच समाविष्ट गावात विकासाची गंगा वाहू लागली असून कायापालट होत आहे. या विकास कामांच्या जोरावर आमदार निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असून नागरिकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार लांडगे यांनी मतदारसंघात मेळावे, कोपरा सभा, निर्धार संकल्प मेळावे घेत प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
आमदार लांडगे यांनी सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मतदारसंघातील डुडूळगाव, मोशी, जाधववाडी परिसरातील नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. वाड्या, वस्त्यांवर जात आमदार लांडगे यांनी जनतेचे आर्शिवाद घेतले. लक्ष्मीनगर, गायकवाड वस्ती, मोशी गावठाण, शिवाजीवाडी, नागेश्वरनगर, देहू रस्ता, गणेशनगर, सस्तेनगर, बारणेवस्ती, संभाजीनगर, बनकरवस्ती, हजारे वस्ती, बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांनी भेटी-गाठी घेतल्या.
पदयात्रा काढली. ठिकठिकाणी कोपरा सभा पार पडल्या. या सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लहान थोरांसह सर्वांकडून आमदार लांडगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी महिलांनी आमदार महेश लांडगे यांचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या.















