न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २७ उमेदवारांची नावे आहेत.
मनसेने निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते, नेते आग्रही होते. मनसेच्या पहिल्या उमेदवार यादीवर नजर टाकल्यास मनसेने शहरी भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होते. राज ठाकरे दादारमध्ये राहतात. त्या माहिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेच्या विविध आंदोलनाचा चेहरा असलेले अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील तर कल्याण पश्चिमेतून प्रकाश भोईर नाशिक पूर्वमधून माजी महापौर अशोक मुर्त़डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यात हडपसरमधून वसंत मोरे, कोथरुडमधून किशोर शिंदे, नाशिकमध्यमधून नितीन भोसले, कसाब पेठमधून अजय शिंदे, चेंबूरमधून कर्णबाळा दिनबुळे यांना उमेदवारी दिली आहे. दहिसर, दिंडोशी, कांदिवली, गोरेगाव, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, वांद्रे पूर्वेमधून मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत.















