न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली. महायुतीत पिंपरी मतदारसंघ हा शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपचे अमित गोरखे यांनी बडखोरी केली आहे.
गोरखे यांनी आज रॅली काढत आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. गोरखे यांच्यासोबत भाजप नगरसेवक तुषार हिंगे, शीतल शिंदे, नगरसेविका सुजाता पालांडे, काँग्रेसचे मनोज कांबळे उपस्थित होते.















