न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- अल्पवयीन फिर्यादी मुलगी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गरबा खेळून आपल्या घरी पायी जात होती. त्यावेळी मोटारीतून आलेला आरोपी अक्षय तुरूकमारे याने तिच्याजवळ मोटार थांबविली आणि तिला गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी मुलीच्या नातेवाईकांनाही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. १) रोजी घडली. अक्षय तुरूकमारे, राहूल दांडे (दोघेही रा. बौद्धनगर, पिंपरी), सोनू आणि सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.