न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :-पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी आज (गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथील निवडणूक कार्यालयात चाबुकस्वार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे, भाजपच्या प्रदेश नेत्या उमा खापरे उपस्थित होते.
शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली. त्यामध्ये महायुतीने शहरातील तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यानुसार पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली असून चाबुकस्वार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.











