न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या आरपीआयच्या सचिव चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी केली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा आरपीआय आठवले गट यांना सोडण्यास आमचे नेते माननीय मंत्री रामदास आठवले यांनी विनंती केली होती.
परंतु, आम्हाला सन्मानाची वागणूक न देता आमची विनंती फेटाळून लावली. परंतु, आमची ताकद संपूर्ण मतदारसंघात आहे. त्यानुसार मी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सोनकांबळे म्हणाल्या.
सोनकांबळे यांनी मागील पंचवार्षिक निवडणूक भाजप-आरपीआयकडून लढविली होती. उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











