न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- बंडखोरी करणाऱ्यांना महायुतीत स्थान नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महायुतीची पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीची घोषणा केली. त्याचवेळी बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
एवढंच नाही तर यावेळी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला आहे. भाजपा १५०, शिवसेना १२४ तर मित्रपक्ष १४ जागांवर लढणार असा हा फॉर्म्युला आहे. यावेळी बंडखोरी करणाऱ्यांना महायुतीत स्थान नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं आहे.















