न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी रॉड, कोयता यांसारखी घातक हत्यारे बाळगून दंगा, खुनाचा प्रयत्न, हल्ल्याची पूर्व तयारी करून अनधिकृतपणे घरात घुसणे. तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान करणे, गंभीर दुखापत, दंगा, डांबून ठेऊन खंडणी मागणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे यांसारखे गुन्हे रहाटणी येथील २५ वर्षीय सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सुमित उर्फ राधे दयानंद सोमवंशी (वय २५, रा. नखातेवस्ती, रहाटणी), असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे. कारवाई केलेल्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात केली असून याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शुक्रवारी (दि. ४) दिले.