न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३५ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (शुक्रवारी) अंतिम मुदत होती. या मुदतीत ३५ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत.
यात शिवसेना – भाजप महायुतीकडून गौतम सुखदेव चाबुकस्वार, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पक्षाकडून दोन आणि अपक्ष दोन असे चार अर्ज दाखल केले आहेत. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनीही एबी फॉर्मसह राष्ट्रवादीकडून अर्ज भरला आहे. त्यांनी अपक्ष देखील अर्ज भरला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुंदर मसूकांत कांबळे, भापसे पार्टीचे दिपक महादेव ताटे, राष्ट्रवादी रिपल्विकन पार्टीचे डॉ. राजेश यशवंतराव नागोसे यांनी अपक्ष देखील अर्ज भरला आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद गंगाराम हेरोडे, बहुजन समाज पार्टीचे धनराज गोविंद गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण विश्वंभर गायकवाड यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे अशोक रामचंद्र आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मिनाताई यादव खिलारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किसन शंकर कांबळे, जनता पार्टीचे डॉ. अभिजीत भोलाजी भालशंकर, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप सुरेश कांबळे यांनी पक्षांकडून अर्ज भरले आहेत. अमित गणपत गोरखे, नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ, भीमा सखाराम बोबडे, आरपीआयच्या चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे, शेखर अशोक ओव्हाळ, मुकुंदा आनंदा ओव्हाळ, राजू विश्वनाथ बनसोडे, संदीपान रामा झोंबाडे, उत्तम मुक्ताजी हिरवे, विजय हनुमंत रंदील, अजय हनुमंत लोंढे, मनोज विष्णू कांबळे, दिपक दगडू जगताप, चंद्रकांत अंबादास माने, सतिश रामभाऊ भवाळ, गौरीशंकर महीपती झोंबाडे, नरेश सुरज लोट, वैशाली बबन देटे, हेमंत अर्जुन मोरे, युवराज भगवान दाखले, अजय चंद्रकांत गायकवाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.















