न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २० उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (शुक्रवारी) अंतिम मुदत होती. या मुदतीत २० उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी माधार घेण्याची अंतिम मुदत आहे.
महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी तीन अर्ज भरले आहेत, पूजा महेश लांडगे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे पुरुस्कृत अपक्ष विलास लांडे यांनी दोन अर्ज भरले आहेत. अपक्ष दत्तात्रय बाबूराव साने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दत्तात्रय कोंडीबा जगताप, समाजवादी पार्टीच्या वहिदा शहेनु शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर सुरेश बो-हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास भगवान गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज जब्बार शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय लक्ष्मण आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ रामचंद्र अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आत्माराम पवार, हमारी अपनी पार्टी राजवीर दशरथ पवार, महेश दिलीप तांदळे, डॉ. मिलिंदराजे दिंगबर भोसले, हरेश बाजीराव डोळस, छाया संजय जगदाळे, मारुती गुंडाप्पा पवार, जालिंदर किसन शिंदे, विष्णू एकनाथ शेळके यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत.















