न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- बारावीत शिकत असलेल्या मुलावर दुचाकीवरून आलेल्या आरोपीने दोन गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने विद्यार्थ्याला गोळी लागली नाही किंवा कोणतीही दुखापत झाली नाही.
पिंपळे गुरव येथील जुन्या सांगवीतील पवनानगर येथे शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रोजी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोशन सोळंकी व चैतन्य कदम असे आरोपींची नावे आहेत. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून निघून गेले. सांगवी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.