न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ रोजी पिंपरी येथे होणार आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी बैठक रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता शिवसेना भवन आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे, युवासेनेचे जितेंद्र ननावरे, विश्वजीत बारणे, अभिजीत गोफण, शर्वरी जळमकर, प्रतीक्षा घुले उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीस शिवसेना, युवासेना, भा. विद्यार्थी सेना, महिला आघाडी व शिवसेना अंगीकृत संघटना यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले आहे.


















