न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- २०६ (अ.जा.) पिंपरी विधानसभा मतदार संघ, सुनिल वाघमारे, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जन जागृती sveep कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सन २०१९ चे विधानसभा निवडणुक मतदान टक्केवारी वाढविणेसाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी तसेच १००% मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचाच भाग म्हणुन (दि. ५) शनिवार रोजी स. ७.३० वाजता गोदावरी हिंन्दी विद्यालयातील २१०० विध्यार्थी व ७० शिक्षक व कर्मचारी यांनी मतदार जागृती करीता भव्य रॅलीचे आयोजन करुन खंडोबामाळ चौक आकुर्डी येथे मध्यभागातील सर्कल तसेच चौकाच्या चारीबाजुने विध्यार्थ्यानी पोस्टर बॅनर घेऊन मतदान करणेकरीता नागरीकांना अवाहन केले. व भारतीय लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता गोदावरी हिन्दी विध्यालयाचे अध्यक्ष तिवारी एस.एस., प्राचार्य मिश्रा राधेशाम तसेच सुनिल वाघमारे मतदान नोंदणी अधिकारी यांची व्याख्याने झाली.
१००% मतदारांनी मतदान करणेकरीता घोषणा देण्यात आल्या त्यानंतर मतदान करणेबाबत शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी गोदावरी विध्यालयाचे कु सोनल तिवारी महासचिव भारतीय ज्ञानसभा उपप्राचार्य सुषमा पाटील शिक्षक सुनिता मुर्खजी, सि.डी. पिंगळे, सुरेश पांड्ये, वंदना पांड्ये,
मिना मस्के, निर्मला संधू, शिक्षक कर्मचारी तसेच २०६ पिंपरी विधानसभा मतदार संघातील sveep कक्षाचे मुकेश कोळप, तानाजी सावंत, सुशांत जोशी हे उपस्थित होते.
तसेच स. ९.३० वाजता म्हाळसांकांत विघ्यालय आकुर्डी येथील १००० विध्यार्थीनी व १५० शिक्षक व कर्मचारी यांनी मतदार जागृती करीता भोंडला या
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन विध्यार्थ्यानी पोस्टर बॅनर घेऊन मतदान करणेकरीता घोषणा देऊन नागरीकांना अवाहन केले.
भारतीय लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता म्हाळसांकांत विध्यालयाचे उपप्राचार्य विलास कातोरे तसेच सुनिल वाघमारे मतदान नोंदणी अधिकारी यांची व्याख्याने झाली. १००% मतदारांनी मतदान करणेबाबत शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी म्हाळसांकांत विघ्यालयाचे प्राचार्य अन्सार शेख, प्राध्यापक सुनिल मचाले, प्रा. अशोक जगताप, प्रा.चव्हाण व्हि ए, प्रा. वाबळे बी. पी व सर्व कर्मचारी तसेच २०६ पिंपरी विधानसभा मतदार संघातील sveep कक्षाचे मुकेश कोळप, तानाजी सावंत, सुशांत जोशी हे उपस्थित होते, अशी माहिती २०६ (अ.जा.) पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली.


















