न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड, बिजलीनगर रस्त्यावर सांगवीकडे जाणारी मुख्य गुरुत्व जलवाहिनी सायंकाळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी सांगवी तसेच चिंचवड गुरूत्ववाहिनी काही काळासाठी बंद केली असून आज रात्रीचा आणि उद्या (रविवारी) पिंपरी, चिंचवड परिसरातील सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
बिजलीनगर – चिंचवड रस्त्यावर सांगवीकडे जाणारी मुख्य गुरुत्व जलवाहिनी आज (शनिवारी) सायंकाळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी सांगवी तसेच चिंचवड गुरूत्ववाहिनी काही काळासाठी बंद कराव्या लागणार आहेत.
या पार्श्वभूमीवर दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, वैदू वस्ती, सुदर्शन नगर, कासारवाडी (गेटाखालचा भाग) पिंपळे सौदागर, पिंपरी, भाटनगर, चिंचवड या भागांमधील आज रात्रीचा तसेच उद्या सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.


















