न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून २९ उमेदवारांचे ४४ अर्ज वैद्य ठरले आहेत. पिंपरी विधानसभा लढविण्यासाठी अंतिम मुदतीत तब्बल ३५ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले होते. या अर्जांची आज (शनिवारी) छाननी झाली. यामध्ये ३५ पैकी ५ उमेदवारांचे सहा अर्ज अवैद्य ठरले आहेत.
शिलवंत यांच्यासह मनसेचे किसन शंकर कांबळे, जनहित पक्षाचे अशोक रामचंद्र आल्हाट, जनता पार्टीचे डॉ. अभिजीत भालशंकर, अपक्ष वैशाली बबन देठे यांचे सहा अर्ज अवैद्य ठरविण्यात आले आहेत.
तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांचे २४ अर्ज पात्र ठरले आहेत. भोसरीतून २० उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले होते. यापैकी दोन उमेदवारांचे ३ अर्ज बाज झाले असून २४ अर्ज पात्र झाले आहेत. पूजा लांडगे, राजवीर दशरथ पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.


















