- मुख्य लढत महायुतीचे उमेदवार जगताप विरुद्ध शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांच्यातच
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- राज्यात सर्वत्र महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा तसा विरळच म्हणावा लागेल. या मतदारसंघात विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
आज सोमवार (दि. ७) रोजी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिनांक होता. महायुतीच्या नेत्यांनी कलाटे यांना विविध अर्ज विनंत्या करूनही त्यांनी कार्यालयीन वेळ संपूनही माघार न घेता मैदानात ठाम राहण्याचा पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे या मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार आ. जगताप व शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यातच पहावयास मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे राष्ट्रवादी कलाटे यांना पुरस्कृत करणार? याचे उत्तर लवकरच मिळेल.


















