न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विविध पक्ष व अपक्ष अशा १३ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे. आज उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता.
यात भाजपकडून अपक्ष उमेदवार अमित गोरखे, भिमा बोबडे, आरपीआय च्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी अपक्ष उमेदवार शेखर ओव्हाळ, राजू बनसोडे, सुलक्षणा धर, विजय रंदिल, संदिपान झोंबाडे, सुंदर कांबळे, सतिश भवाळ, गौरीशंकर झोंबाडे, उत्तम हिरवे, मनोज कांबळे आदींचा समावेश आहे.
या सर्वांनी निवडणूक विभागाच्या कार्यालयीन वेळेत आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे उमेदवार आण्णा बनसोडे व वंचित आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यातच होणार आहे.


















