- याशिवाय दहा विविध पक्षांचे उमेदवारही आजमावणार नशीब
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे आणि महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात अटीतटीची निवडणूक होणार आहे.
नेहमी अपक्षांच्या पाठीशी उभा राहणारा हा मतदारसंघ या वेळेस कोणाला कौल देणार हे येत्या २१ तारखेला समजेल.
यांच्याशिवाय समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर बो-हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार, अपक्ष हरेश डोळस, छाया जगदाळे, मारुती पवार हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


















