न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०१९) :- पुण्यात धो-धो पाऊस बरसत आहेत. रस्त्यावर पाणी साचले आहे. अजूनही पाऊस पडतच आहे. त्यामुळे पुण्यात होणारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा रद्द झाली आहे.
या सभेपासून राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकणार होते. पण पावसाच्या खेळामुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली आहे.
सभा रद्द होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. मैदानातून चिखलही काढला. मात्र, पाउस परत सुरू झाल्यामुळे ही सभा रद्द करावी लागली आहे. आजची सभा रद्द झाली असली तरी उद्या गोरेगाव आणि बांद्रा येथे दोन सभा होतील.















