न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या, शुक्रवारी (दि. ११) रोजी तळेगाव येथे जाहीर सभा होणार आहे.
थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे प्राथमिक शाळा, मारुती मंदिर चौक येथे संध्याकाळी ४ वाजता ही सभा होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी दिली.















