न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी मतदारसंघातील व चिखली परिसरातील लोकांना गेल्या २० ते २५ वर्षांपासून रेशनिंगच्या कामासाठी पुण्यामध्ये जावे लागत होते. विविध दाखल्यांसाठी त्यांना पुण्यात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, एका दिवसात हे होणारे काम नसल्यामुळे त्यांचे पैसे आणि वेळेचा अपव्यय होत होता. त्यातच शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे लोकानां मनस्तापास सामोरे जावे लागत होते. मतदारसंघातील लोकांची ही मागील पंचवार्षिकीपासूनची मागणी होती. त्यासाठी मतदारसंघातील तत्कालीन आमदार यांच्याकडे पाठ्पुरावाही केला होता. मात्र लोकांचा हिरमोडच झाला. या अशा अनेक प्रलंबित कारणांमुळेच भोसरी मतदारसंघात लोकांनी परिवर्तन घडवून आणले व आ. महेशदादा लांडगे यांना मोठ्या आशेने निवडून दिलं.
महेशदादांनी मतदारसंघातील लोकांना कधीच अंतर दिले नाही. निवडून येताच त्यांच्या व्हीझनमध्ये या प्रलंबित कामाचा समावेश केला. त्यासाठी राज्य विधीमंडळात लक्षवेधी मांडली. पाठपुरावाही केला. तत्कालीन अन्नपुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडेही तगादा लावला. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत भोसरी मतदार संघात स्वतंत्र परिमंडळ कार्यालय ‘फ’ विभाग मंजूर केला. दादांनी सर्व रेशनिंग दुकानदारांना सोबत घेऊन त्यांच्याशी समन्वय साधला. रेशनिंग विभागाचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडावे, कोणालाही अडचण निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनातला दुवा बनून महेशदादांनी मोलाचे सहकार्य केले.
त्यामुळेच आता भोसरी मतदारसंघातील मतदारांनी ठरवलय, दादांनी जे लक्ष ठेवलंय त्याच्यापेक्षाही जास्तच त्यांच्या पदरात घालायचं. येत्या २१ तारखेला हा सर्व मतदार उस्फुर्तपणे मतदानाला बाहेर पडेल व दादांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करेन, असा विश्वास युवा नेते पांडाभाऊ साने यांनी न्यूज पीसीएमसी शी बोलताना व्यक्त केला.











