न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०१९) :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे उमेदवार विलास लांडे यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे, असे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहिर केले.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, राष्ट्रवादी पुरस्कृत चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीचे उमेदवार विलास लांडे, प्रदेश काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा शामला सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रसेच्या उपाध्यक्षा निगार बारस्कर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी आमदार अण्णा बनसोडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जैसवाल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसिम इनामदार, माजी अध्यक्ष विशाल कसबे, एन्.ए.बारस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी साठे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस महाआघाडीसोबत आहे. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे आहेत. त्यांचा प्रचारात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. परंतू चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे व भोसरी विधानसभेत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांच्या विनंतीवरून आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोन्ही पुरस्कृत उमेदवारांना शहर कॉंग्रेसच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे. पिंपरी विधानसभेप्रमाणे चिंचवड व भोसरी विधानसभेतही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सहभागी होतील, असेही सचिन साठे यांनी सांगितले











