न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०१९) : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १४) रोजी मतदारसंघातील चिखली परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चिखली गावठाण, पाटीलनगर, गणेशनगर, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती विविध भागात पोहोचवून प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. ‘आमच्याकडे लक्ष असू द्या,’ असा आग्रह करत ते मतदारांना वहिनी, दादा, भाऊ, काका असे संबोधत जवळीक साधत होते.
तसेच पांडाभाऊ साने यांनीही गल्लो-गल्ली जाऊन मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. यावेळी विविध स्तरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मतदारही प्रचारा दरम्यान आ. लांडगे यांच्या कामांची स्तुती करीत होते. तसेच यंदाही आ. लांडगे यांनाच विजयी करणार, असा शब्द देत होते. साने यांनीही आ. लांडगे यांनाच प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी मतदारांना केले.












