न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०१९) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि भंडारा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथे ४ ते ६ ऑक्टोबर २०१९ या दरम्यान राज्यस्तरीय अष्टे इ अखाडा – हस्तकला स्पर्धा संपन्न झाल्या.
यात चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विदयालयाच्या चि. बस्वलिंग शिवाजी मस्कले (इ. ८ वी) याने १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत २६ ते ३० किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांनी या यशस्वी खेळाडूचे त्याने मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले आणि केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान व्यक्त केले.
उपाध्यक्ष जगदीश जाधव यांनीही मिळालेल्या यशाबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले. संचालक विजय जाधव, अमित बच्छाव, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, प्रतिभा देशपांडे, उपमुख्याध्यापक किसन आहिरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव आणि क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनी या यशस्वी खेळाडूस राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.











