न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५) :- मराठवाड्यातील भूम-परांडा-वाशी या भागातील पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी शहरातील तीनही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भूम-परांडा-वाशी पुणे रहिवाशी संघातर्फे चिंचवड मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र मंगळवारी (दि. १५) दिले.
यावेळी भूम-परांडा-वाशी पुणे रहिवाशी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज कोकाटे, कार्याध्यक्ष रामराजे सावंत, प्रवीण चव्हाण, उपाध्यक्ष दिवक गटकळ, पप्पू वायसे, सुजाता गजरमल, कैलास कुदळे, भाऊ हरणावळ, सचिव बालाजी महाजन, निलेश चव्हाण, संघटक संतोष सूर्यवंशी, गणेश घाडगे, बंडू रणदिवे, व्यवस्थापक जयराम लांडगे, उपव्यवस्थापक खंडू कोळी, सोशल मीडिया प्रमुख विशाल जाधव, लव कोकाटे, कुश कोकाटे, प्रसिद्धीप्रमुख पप्पू पाटोळे आदी उपस्थित होते.
यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज कोकाटे म्हणाले, “शिवसेनेचे नेते तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये भूम-परांडा-वाशी काम करत आहेत. मराठवाड्यातील या भागातील कष्टकरी नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीन मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.”











