न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५) :- मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना मंगळवारी मातंग वाल्मिकी समाज तसेच रोहिदास समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मंगळवारी सकाळपासून लोणावळा परिसरातील विविध गावांना भेटी देत सुनिल शेळके यांचा प्रचारदौरा सुरु झाला. रामनगर, भुशी, खोंडगेवाडी, सिद्धार्थनगर, गावठाण, शेतकरी पुतळा, जयचंद चौक, नवा बाजार, वर्धमान सोसायटी आदी भागातून सुनिल शेळके यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. सिद्धार्थनगर येथे शेळकेंचा दौरा झाला. येथील वाल्मिकी आणि मातंग समाजाच्या वतीने पात्र देऊन सुनिल अण्णा शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी लोणावळ्याचे मा. सभापती डी .आर. जेधे, सुवर्णा गायकवाड, नगरसेवक आर. डी. जाधव, सामाजिक कार्यकर्ते आकाश थोरप्रिय, लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, श्रीपत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सुनिल शेळके यांना रोहिदास समाजाकडूनही जाहीर पाठिंबा देण्यात आला. नगरसेविका आरोही तळेगावकर,श्री संत रोहिदास समाज तरुण मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पवार, स्वप्ना मानकर,तेजस शिर्के, दीपेश कदम आदी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पक्ष नाही तर माणूस म्हणून आपण सुनिल शेळके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना महाराष्ट्र मातंग समाजाचे अध्यक्ष जरसिंग बोभाटे यांनी व्यक्त केली. समाजाचे उपाध्यक्ष शांताराम साठे, अशोक बोभाटे, विक्रम बोभाटे, राजेंद्र भालेराव, सोमनाथ बोभाटे, अविनाश लोंढे, उदय बोभाटे, गौरव बोभाटे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.











