- युवानेते पांडाभाऊ साने यांची प्रतिक्रिया
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचा परिपूर्ण व सर्वांगीण विकास तसेच महिलांसाठी भयमुक्त वातावरणाची निर्मिती केली. महिलांना रोजगाराचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पवनाथडीच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अंतर्मुख करायला लावणारी ‘इंद्रायणी थडी’ ही नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक कल्पना मतदारसंघात राबविली. आर्थिक, वंचित, बेरोजगार महिलांना समृद्ध, आदर्श, स्वावलंबी व रोजगारक्षम बनवून समाजासमोर आदर्श उभा करण्याचे श्रेय केवळ आमदार महेशदादा लांडगे यांनाच जाते, अशी प्रतिक्रिया युवा नेते पांडाभाऊ साने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, ‘इंद्रायणी थडी’ च्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध बचतगटांशी प्रभाग निहाय बैठका तसेच गट चर्चेद्वारे महिलांमधील अंगभूत गुणकौशल्य दादांनी हेरले. त्याव्दारे अधिकाधिक महिला बचत गटांना यात सहभागी करुन घेतले. भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गट, महिलांनी स्वत: तयार केलेल्या उत्पादनांसाठी काही लाखो लाभार्थ्यांना या जत्रेमध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिले. त्याद्वारे बचत गटांच्या विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला.
सन्मान स्त्री शक्तीचा, गौरव भारतीय संस्कृतीचा’ या संकल्पनेवर आधारित महिलांच्या सक्षमीकरणातून त्या स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा यासाठी हा उपक्रम महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीवर्षी आयोजिला जातो. या जत्रे दरम्यान लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबीर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण महिलांसाठी पारंपरिक खेळ, बेरोजगार युवती व महिलांसाठी रोजगार मेळावा अशा भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून भोसरीकरांसाठी विलक्षण सोहळ्याच्या मेजवानीचे आयोजन करण्याचे श्रेय केवळ महेशदादांनाच जाते.
भोसरी मतदारसंघातील महिला बचतगटांना या निमित्ताने एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. भोसरी मतदारसंघातील या महिला बचतगटांना आपली कला लोकांसमोर मांडण्याची एक अनोखी संधी तसेच ग्राहकांकडूनही या यात्रेत सहभागी खाद्यपदार्थांच्या स्टॉलना पसंतीची विशेष पावती मिळवून देण्याचे भाग्य तसेच महिला बचत गटांना मोठ्ठे पाठबळ व काही कोटींची उलाढाल या सर्व बाबी केवळ आमदार महेशदादांमुळेच फळास आल्या. त्यामुळे समस्त भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनता भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारच आहे, असा विश्वास पांडाभाऊ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.















