न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०१९) :- कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान आयोजित कै. शंकरराव हनुमंतराव तापकीर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी (दि. १७) रोजी काळेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त काळेवाडीतील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय येथे सायं. ५.०० वा. ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (प्रति इंदुरीकर) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच काळेवाडी – तापकीरनगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात मोफत औषध वाटप, नेत्र तपासणी, चष्मे वाटप, वय वर्ष १ ते ५ गटातील बालकांकरिता सुदृढ बालक स्पर्धा, जनरल तपासणी, टी. टी इंजेक्शन, हाडांचा ठिसुळपणा तपासणी, स्त्री व बाल रोग तपासणी, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी आदींचा समावेश आहे.
शहरातील डॉ. गितांजली माने, डॉ. शशिकांत जाधव, डॉ. अजय जाधव, डॉ. प्रशांत सोलापुरे आदी प्रतिथयश डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. या कार्यक्रमांचे उदघाटन श्रीमती उल्हासाबाई हनुमंतराव तापकीर यांच्या शुभहस्ते होणार आहे, अशी माहिती स्वी. नगरसेवक विनोद तापकीर, प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर, उद्योजक निलेश तापकीर, नविन तापकीर, राम तापकीर यांनी दिली.















