- भेटी दरम्यान नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ नोव्हेंबर २०१९) :- प्रभागातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तत्पर आहे. नागरिकांचे प्रश्न समजावून घेवून ते सोडवण्यासाठी ‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महापौर राहुल जाधव यांच्या वतीने सोमवारी ४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान शहरात ठिकठिकाणी हे अभियान राबविले जात आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी आज सोमवरी (दि. ४) रोजी भोसरी मतदारसंघातील बो-हाडेवाडी, आल्हाट वस्ती, विनायकनगर, संजय गांधीनगर येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या, अडीअडचणी बद्दल माहिती घेतली.
या वेळी कचरा, वाहतूक कोंडी, पदपथावर अतिक्रमण, भारत स्वच्छ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय, नाला सफाई, कमी दाबाने पाणी इत्यादी प्रश्न नागरिकांनी विचारले. याबाबत महापौर राहुल जाधव यांनी आठ दिवसांत सर्व तक्रारींचे निरसन होईल, तशा सूचना संबंधित विभागाला देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन यावेळी दिले.












