न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ नोव्हेंबर २०१९) :- दिवाळी निमित्त गावी जात असताना निलेश मारुती साळुंखे हे एका प्रवासी वाहनामध्ये तब्बल ७० हजार रुपयाची रोख रक्कम विसरले होते.
परंतु, वाकड पोलिसांनी तत्परता दाखवत अनोळखी वाहनचालक आणि वाहन शोधून काढले आणि सीसीटीव्हीच्या मदतीने मूळ मालकाला त्याची अमानत परत केली.
निलेश मारुती साळुंखे असे तक्रारदार प्रवाशाचे नाव असून ते मुंबईत बोरीवली येथे राहतात. निलेश हे दिवाळीनिमित्त सातारा या मूळ गावी जात होते. तेव्हा ही घटना त्यांच्यासोबत घडली. पैसे परत मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.


















