न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका हॉटेलच्या लेडीज वाॅशरुममध्ये कॅमेरा ठेऊन चिञीकरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्याने महिलांचे चिञीकरण करण्यात येत होते.
याप्रकरणी राम देब नाथ (वय २४, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाॅटेलचे कर्मचारी राकेश शेट्टी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी चौक ते फेज तीनकडे जाणाऱ्या रस्त्यावर बी लाईव्ह नावाचे हाॅटेल आहे. रविवारी रात्री नऊ वाजता आरोपी नाथ याने लेडीज वाॅशरुमध्ये मोबाईल कॅमेरा ठेवला व महिलांचे अधिक तपास पोलीस करीत आहेत.













