न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील इफ्को टोकिओ या विमा कंपनीकडून शेतकर्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप करत, याच्या निषेधार्थ पुण्यातील शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.
राज्यातील शेतकर्यांच्या हक्कांचे पैसे मिळावे. म्हणून, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी पीक विम्याचे पैसे दिले जातील असे आश्वासन विमा कंपन्यांकडून दिले गेले होते. मात्र अद्याप देखील पैसे दिलेले नाही. त्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे शिवसेना शहर पक्ष प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.













