न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी डेअरी फार्मच्या मोकळ्या जागेत कडुलिंबाच्या झाडाला तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाने पिंपरी पोलिसांना दिली.
त्यानुसार, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या डेअरी फार्मच्या मोकळ्या जागेत एका कडुलिंबाच्या झाडाला तरुणाने पांढ-या कापडाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष आहे. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे.
निळ्या, पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट, निळी जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचे बूट, ब्राऊन रंगाचा बेल्ट, दाढी वाढलेली, केस काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे वर्णन आहे. पोलीस तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. वरील वर्णनाच्या तरुणाबाबत माहिती असल्यास पिंपरी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.














