न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- चिखली गावातील दुग्ध व्यवसायिक सुदाम नथु यादव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अत्यंविधी चिखली येथे इंद्रायणी काठी संपन्न झाला.
त्यांच्या पाठीमागे सामाजिक कार्यकर्ते विलास सुदाम यादव व हाँटेल व्यवसायिक पोपट सुदाम यादव ही दोन मुले व दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. पिं. चिं. महापालिका ‘ फ ‘ क्षेत्रीय विभागाचे स्वी. सदस्य दिनेश यादव हे त्यांचे पुतणे होत.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि. १६) रोजी चिखलीतील इंद्रायणी नदीकाठी होणार आहे.















