न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी ही प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आज आयुक्त कक्षेत झालेल्या या कार्यक्रमास क्रिडा समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अपक्ष आघाडीचे गटनेते बाबा बारणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, सह क्रीडा शिक्षक बन्सी आटवेसर, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोनाली जाधव, कृष्णराव टकले, तात्या बारणे, प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, संघाची कर्णधार मनीषा राठोड यांच्यासह कबड्डी खेळाडू संघ आदि उपस्थित होते.















