न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना हा त्रास जाणवत होता मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.


















