न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाशिवआघाडीचे सरकार येणार आहे.
भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलवलं. त्यानंतर दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार हे नक्की झालं आहे. सत्ता स्थापनेसाठीचा दावा शिवसेना करणार आहे.
सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं शरद पवार यांना फोन करुन सांगितलं. पाठिंब्याचं पत्रही फॅक्स केलं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंब्याचं पत्र शिवसेनेला दिलं. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. काही वेळातच सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना करणार आहे.















