- राष्ट्रवादीला राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी २४ तासांची मुदत
- शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही, त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही.
त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र तसं काहीही घडू शकलेलं नाही. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवू शकतात? की राष्ट्रपती लागवट लागू करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.
या घटने दरम्यान राज्यपालांनी राष्ट्रवादीला पाचारण केले असून, कशासाठी बोलावले याबाबत स्पष्ट नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे.















