न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ ह ‘ क्षेत्रीय कार्यालयार्तंगत गुरुवारी (दि. ७) रोजीच्या मा. प्रभाग समिती मासिक बैठकीमध्ये सन्मा. नगरसदस्यंनी केलेल्या मागणीनुसार अंबरनाथ कांबळे ह प्रभाग अध्यक्ष यांनी ह क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील प्रभाग क्र. २०,३०, ३१, ३२ मध्ये असलेल्या नागरी समस्येबाबत नगरसदस्य समवेत पाहणी दौरा आयोजित केला होता.
त्यानुसार (दि. ११) रोजी प्रभाग क्र. ३२ जुनी सांगवी येथील समक्ष पाहणी दौ-यामध्ये प्रभागातील नगरसदस्या माई उर्फ उषा ढोरे यांनी सांगवी गावठान येथील भाजी मंडईची दुरुस्ती करण्यात येऊन रस्त्यावरील हातगाडीधारकांचे मंडईमध्ये स्थलांतरीत करण्यात याव्यात तसेच पिण्याचे पाण्याची लाईन व मलनिसरणाचे ड्रेनेज लाईन बाबतच्या समस्या मांडल्या आहेत.
नगरसदस्या शारदा सोनवणे यांनी जुनी सांगवी येथील पाण्याच्या टाकीमधील पिण्याच्या पाण्यातील तपासणी केली तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनात आणून दिले.
मा. नगरसदस्य हर्षल ढोरे यांनी पवारनगर येथील मोकाट जनावरे व भटके कुत्र्यांचा बंदोवस्त करण्याच्या व परीसरातील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
नगरसदस्य संतोष कांबळे यांनी ममतानगर, नँशनल स्कूल समोरील सोसायटीमधील डुकरांचा वावर वाढला असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करून परीसरात स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या.
वरील पाहणी दौ-याकरीता प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, प्रभागातील सर्व सन्मा. नगरसदस्य, प्रदिप पुजारी कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग, दिलीप धुमाळ उपअभियंता विद्युत विभाग, श्रीम. सुरेखा कुलकर्णी उपअभियंता पाणीपुरवठा, डॉ. दगडे पशुवैदयकीय विभाग, सासवडकर डी.एस. सहा. आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग, श्रीकांत कोळप प्रशासन अधिकारी ह क्षेत्रीय कार्यालय, उद्यान विभागाचे प्रतिनिधी पटेल व प्रभागातील नागरीक, सर्व सन्मा. पदाधिकारी व अधिकारी हजर होते.















