न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अस्वच्छते संदर्भात पाहणी करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराचा दौरा सुरू केला आहे. अधिकार्यांना सोबत घेऊन त्यांनी सोमवारी पिंपळे गुरव, वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख या आदींची पाहणी केली आहे.
स्मार्ट सिटीत सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्याच्या कामासाठी सुरक्षा बॅरिकेट्स लावण्याचा सूचना आयुक्तांनी अधिका-यांना दिल्या आहेत. या रस्त्याच्या बाजूने ९०० मिमी. व्यासाचे स्ट्रॉर्म वॉटर लाईन तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहेत.















