न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०१९) :- राज्यातील २७ महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या पुढील आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहावा मजला मंत्रालय मुंबई येथे बुधवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता आयेाजित केली आहे.
यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाची देखील सोडतीद्वारे आरक्षण निश्चित होणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरला राज्यातील महापालिकांचे महापौर व उपमहापौर यांच्या पदाची वाढीव मुदत संपणार आहे. त्यामुळे येत्या २१ नोव्हेंबर २०१९ रोजी नवीन महापौर व उपमहापौर यांची निवड निश्चित होणार आहे.
उद्या मुंबईत होणाऱ्या सदर सोडतीच्या वेळी महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांनीही या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन अव्वर सचिव यांनी केले आहे.















