न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- ‘आम्ही विकासकामे मतदारसंघातील सर्वसामान्यांशी चर्चा करुनच करतो. फक्त निवडणुकीपुरते जनतेकडे येत नाहीत तर, कायमचा संपर्क ठेवुन आम्ही जनतेच्या अडी-अडचणी सोडवतो. आजपर्य़ंत या भागाचा विकास आमच्यामुळेच झाला. या मतदारसंघात कोणाच्या थापा व दबावाला बळी न पडता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून व महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय लोकाभिमुख उपक्रमांतून गेल्या पाच वर्षात आमदार महेश लांडगे यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे. आम्ही त्याच सामाजिक विकासाच्या ध्येयाने काम करत आहोत. आम्ही फक्त ईलेक्शन आल म्हणुन, लोकांशी संपर्क नाही करत, तर ईलेक्शन झालं तरी, आम्ही जनतेत जाऊन त्यांच्या समस्या समजुन घेऊन पूर्णत्वास नेतो. या प्रभागातील प्रलंबित विकासाचा अनुशेषही लवकरच भरून काढू’, असे युवा नेते व आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक पांडाभाऊ साने म्हणाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे जवळपास लाखाच्या मताधिक्याने विरोधी उमेदवारचा पराभव करून विजयी झाले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक एकमधील म्हेत्रेवस्ती, मोरेवस्ती, साने चौक परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना युवा नेते पांडाभाऊ साने बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, आमदार महेश लांडगे हे विक्रमी मताधिक्क्यानी विजयी झाले. मात्र, ते विजयाच्या उन्मादात न राहता, निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून नागरिकांशी संवाद साधत, मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा घेत आहेत. प्रलंबित विकासकामे लवकर उरकण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करीत आहेत. सर्वसामान्य जनताही आमदारांच्या भुमिकेचे स्वागत करत आहे. निवडणुक लढविण्याचा उद्देश, गतकाळात केलेली कामे तसेच या भागातील प्रलंबित प्रश्नाची नोंद घेत प्रश्नांची सोडवुन करून जनतेला दिलासा देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.