न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी २०२० मध्ये म.न.पा.परिसरातील म.न.पा.व खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थी खेळाडू यांच्या महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२० (Teen २०) अनुषंगाने सोमवार दि.१८/११/२०१९ रोजी स.११.०० वा आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी ४११०१८ येथे म.न.पा. व खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व संबंधित खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेस म.न.पा. व खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व संबंधित खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तुषार हिंगे, सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, अभिषेक बारणे, सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, अजित पवार, अतिरिक्त आयुक्त, संदिप खोत, सहाय्यक आयुक्त (क्रीडा), रज्जाक पानसरे, क्रीडा अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक ई. उपस्थित होते.
महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२० (Teen 20) चे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत १७ खेळ प्रकारांचा समावेश आहे. यात फुटबॉल ७, व्हॉलीबॉल १३, योगा २, कबड्डी ८, जलतरण १४, क्रिकेट ३, खो खो ९, स्केटिंग १५, बास्केटबॉल ४, मैदानी खेळ (अॅथलेटिक्स) १०, हॉकी १६, हँड बॉल ५, बुद्धीबळ ११, कुस्ती १७, कराटे ६, बॅडमिंटन १२, थ्रोबॉल
सदर सभेत या १७ खेळ प्रकारांच्या ऑन लाईन प्रवेशिका, स्पर्धा ठिकाणे, या स्पर्धेकरिता लागणारे पंच, स्पर्धा अनुषंगाने करावयाची तयारी, विजेते, उपविजेते खेळाडूंना द्यावयाची बक्षिसे व स्पर्धा अनुषंगाने इतर बाबींवर चर्चा केली गेली. तुषार हिंगे, सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती यांनी महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२० (Teen 20) अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भुमिका स्पष्ट केली.
अजित पवार, अतिरिक्त आयुक्त यांनी सदर स्पर्धांच्या अनुषंगाने उपस्थित क्रीडा शिक्षक व संघटनेच्या पदाधिका-यांना संबोधित केले. सदर सभेमध्ये उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार, अतिरिक्त आयुक्त यांनी उत्तरे दिली व स्पर्धा पूर्वी सर्व शाळेच्या शिक्षकांची स्पर्धा पूर्व तयारी व प्रशिक्षण यासाठी नजिकच्या काळात एक कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी सुचना दिल्या. सभेच्या शेवटी संदिप खोत, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) यांनी उपस्थितांचे आभार मानुन महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा २०२० (Teen 20) अनुषंगाने पिंपरी चिंचवड म.न.पा. परिसरातील सर्व म.न.पा. व खाजगी शाळांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले, अशी माहिती तुषार हिंगे, सभापती क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती यांनी दिली.















