- बांगलादेशाच्या निर्मितीत इंदिराजी यांच्या राजकीय प्रगल्भतेची अनुभूती – सचिन साठे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- श्रीमती इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता १९३० मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ देखील उभी केली होती. सप्टेंबर १९४२ साली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. १९४७ साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले, अशी धाडसी वृत्ती त्यांच्या स्वभावात उपजतच होती. बांगलादेशाच्या निर्मितीत त्यांची राजकीय प्रगल्भता देशाने अनुभवली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.
स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संत तुकारामनगर पिंपरी येथील कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सचिन साठे यांच्या हस्ते इंदिया गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय कॉंग्रेस सेवादलाचे सहसचिव संग्राम तावडे, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सदस्या निगार बारस्कर, महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गौतम आरकडे, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शीतल कोतवाल, मनसुफ खान, हिरामण खवळे, मयूर रोकडे, सागर धावडे, रामदास बंडलकर, शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.















