न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- रावेत येथील नदीपात्रालगत टाकण्यात आलेल्या कचऱ्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने संबंधितावर गुन्हा दाखल करून कचरा त्वरित उचलण्याची मागणी केली होती.
या मागणीचा गांभीर्याने विचार करीत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने परिसरातील संपूर्ण कचरा उचलून परिसर स्वच्छ केला व आपले कर्तव्य निभावले. त्या बदल्यात महानगरपालिका प्रशासनाचे आणि आयुक्तांचे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आभार मानले.















