- डीपी मधील प्रस्तावित “एचसीएमटीआर” मार्गिकेमध्ये पालिकेचा परस्पर बदल
- टीडीआर-एफएसआय साठी सत्ताधारी, प्रशासन व बांधकाम व्यवसायीकांचा संगनमताने नियमबाह्य फेरबदल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०१९) :- सुधारित डीपी झाला नसताना व शहरातील एचसीएमटीआर ला महाराष्ट्र शासनाची मंजुरी नसताना सदर रस्त्याचे काम कोट्यवधी रुपये खर्चून कासारवाडी व कोकणे चौक परिसरात बेकायदेशीरपणे सुरू आहे. मे. व्ही एम मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनी कडे सदरचे काम दिलेले आहे.
सन १९९५ च्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या व प्राधिकरणाच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र नगरविकास खाते यांनी एचसीएमटीआर ला मंजुरी दिलेली नसताना वरील दोनही संस्था सदर प्रकल्पाच्या नावे अनेक प्रकारचे भूखंड गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. डी पी ओपनिंग मधील दर्शवलेल्या नकाशातील आखनीमध्ये वरील दोन्ही संस्थानी बेकायदेशीरपणे बदल करून मूळ डी पी तील एचसीएमटीआर आखणी जागेवर बांधकामाना परवानग्या दिल्या व तसेच प्राधिकरणाने एचसीएमटीआर आखणीतील जागा बिल्डर व्यवसायिकांना विकल्या.
मूळ डीपी आखणी काळेवाडी फाटा ते फुगेवाडी असा असून त्याचे सर्व्हे नंबर २५,२६,१६,१७,१८ (रहाटणी), १२१, १२०, ११९, १२६, १२७, १२८, १०८, १०७, १०६, १०३, १०२, १०१, १००, ९८, ९७, ९६, ९१, ९०, ८५, ८३, ७४, ७५, ७७, ७८, ६०, ६१, ६२, ६३, ५२, ५१, ५०, ४५, ४९ (पिंपळेसौदागर), ६९, ७०, ७१, ४७, ४६, ४४, ४३, ६५, २६,२५,०८,०९,१२,१३ (पिंपळे गुरव) अश्या पद्धतीने ह्या सर्व्हे मधून मूळ डी पी ओपनिंग एचसीएमटीआर ची आखणी असताना त्यामध्ये महापालिका प्रशासनाने राज्यकर्त्यांच्या हितासाठी व काही बांधकाम व्यवसायिकांच्या फायद्यासाठी रहाटणी सोडून मोठ्या भूभागावर बांधकाम परवाने दिले. त्यामुळे सदर ठिकाणी मोठया प्रमाणात बांधकामे उभी राहिली.
प्राधिकरणाने विक्री केलेली जागा, (रहाटणी) सर्व्हे नंबर २६,१६,१८ व २५ मधील नियोजित एचसीएमटीआर ची जागा औध बीआरटी साठी नियमबाह्य पद्धतीने वापरण्यात आली. अश्या प्रकारे दोन्ही संस्थानी डी पी ओपनिंग मधील एचसीएमटीआर च्या मूळ आखणीला मोठा छेद दिला. सर्व्हे न. २५ रहाटणी येथील डीपी तील नियोजित जागा औंध-रावेत बीआरटी व काळेवाडी फाटा देहू आळंदी रोड बीआरटी साठी वापरून झाल्यानंतर प्राधिकरणाने सर्व्हे न २५ मध्ये पुन्हा एचसीएमटीआर साठी ४५ मी रुंदीची जागा दर्शवली. सदर सर्व्हे नंबर पासून पुढे दोनही संस्थानी एचसीएमटीआर साठी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता नवीन एचसीएमटीआर ची आखनी दर्शवली.
नवीन दर्शविलेली आखणी पुढीलप्रमाणे रहाटणी (सर्व्हे नंबर – २५, २८, २७, १६, १५, १४, ११, १०, ०९, ०६,) त्यापुढे पिंपळे सौदागर (सर्व्हे नंबर -१६९, १६८, १६५, १७३, १६३, १६१, १६०, १५९, १५८, १५५५, १५४, १५२, १५१, १४५, ७१, ७०, ०६, १०, २१, २२, ३०, ३१, २८) पिंपळे गुरव (सर्व्हे नंबर-८४, ६९९, ७००, ४९६, ४९५, ४९४, ४९३,४९२,४९१,४९०,४८७,४८४,४८३,४८२,४४१,४८०,४७९,४७८,४७७,४७६,४७५) वरील प्रमाणे बेकायदेशीरपणे दर्शवली.कुठल्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता सदर केलेली आखणी च्या शेजारी बांधकाम व्यवसायिकांच्या इमारतींना सन २००० पासून २०१८ पर्यंत परवानग्या देण्यात आल्या. सदर ठिकाणी रस्ता अस्तित्वात नसताना त्यांना टीडीआर, एफएसआय चे वाटप करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला आहे. महापालिकेने वरील दर्शवलेल्या आखणीतील सर्व्हे नंबर मधील जागामालकांच्या जमिनी अ आणि ब पत्रक भरून ताब्यात घेतल्या.
बेकायदेशीर आखणीतील एचसीएमटीआर जागेवर ११ कोटी रुपये खर्चून लिनीअर गार्डन ही बनविण्यात आले. सदर नवीन आखणीला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली नाही. असे असताना रहाटणी मधील सर्व्हे नंबर ६ ते २५ मधील १.६ किमी रस्ता बांधणीसाठी (कोकणे चौक ते काळेवाडी फाटा) महापालिका प्रशासनाने बेकायदेशीर २८ कोटींची मंजुरी दिली. अश्या पद्धतीने एचसीएमटीआर च्या मूळ आखणीमध्ये बदल करून महापालिकेने कोणाचे हित साधले आहे हे स्पष्ट करावे. माननिय पंतप्रधान तसेच राज्यपाल महोदयांनी या संदर्भात तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.















